कोरोगाव भीमा प्रकरण : प्रा. हनी बाबूच्या घरावर एनआयएचे छापे

02 Aug 2020 15:13:03

Prof Babu_1  H





नवी दिल्ली
: राष्ट्रीय तपास यंत्रणेतर्फे (एनआयए) आज कोरोगाव भीमा एल्गार परिषद हिंसा प्रकरणात अटक दिल्ली विद्यापीठातील प्रा. हनी बाबू याच्या फ्लॅटवर छापेमारी केली आहे. हनी बाबू नोएडातील सेक्टर ७८ येथे राहतो. एल्गार परिषद हिंसाचार प्रकणात ४ ऑगस्टपर्यंत तो एनआयएच्या कोठडीत आहे. त्याला २७ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. 

५४ वर्षीय हनी बाबू मुसालियर विट्टिल थारियाल उत्तर प्रदेशच्या गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील मुळ रहिवासी आहेत. दिल्ली विद्यापीठात इंग्रजी भाषेचे प्राध्यापक आहेत. ३१ डिसेंबर २०१७ मध्ये पुण्यातील शनिवार वाड्यात कबीर कला मंचद्वारे आयोजित एल्गार परिषदेच्या कार्यक्रमात कथित भडकाऊ भाषण दिस्याचा आरोपशी संबंधित हे प्रकरण आहे. 


यामुळे वैमनस्य वाढले आणि हिंसाचार घडला, असा आरोप आहे. याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. एनआयएच्या अधिकाऱ्यांकडून चौकशीदरम्यान अनेक खुलासे करण्यात आले आहेत. भाकप माओवादी वरिष्ठ नेत्यांशी देशविरोधी कृत्य करणाऱ्या प्रतिबंधितात्मक कारवाईखाली अटक असलेल्या भाकप (माओवादी) वरिष्ठ नेत्यांनी एल्गार परिषदेच्या आयोजकांशी संपर्क केल्याचा या आरोप आहे.
 
Powered By Sangraha 9.0