गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण

02 Aug 2020 17:27:17
Amit Shah_1  H
 
 
 
 
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. काही लक्षणे दिसल्यावर गृहमंत्र्यांनी कोरोना चाचणी केली होती, त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. स्वतः ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये अमित शाह म्हणतात, "सुरुवातीला कोरोनाची काही लक्षणे आढळल्यावर मी टेस्ट केली होती. त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे."


 
 
 
पुढे ते म्हणतात, 'माझी प्रकृती स्थिर आहे, परंतू डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी आता रुग्णालयात दाखल होत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने स्वतःची टेस्ट करून घ्यावी तसेच स्वतः विलगीकरण कक्षात रहावे,' अशी विनंती त्यांनी इतरांना केली आहे.
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. शिवराज सिंह यांचा उपचाराचा नववा दिवस आहे.
 
 
 
शिवराजसिंह यांना कोरोनाची कुठलीही लक्षणे आढळलेली नाहीत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरोनाची दुसरी चाचणी निगेटीव्ह आली तर त्यांना लवकरच घरी पाठवण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे, दरम्यान, रविवारी पुन्हा कोरोनाचे ५० हजार नवे रुग्ण आढळले आहेत. रविवारी सकाळपर्यंत कोरोना मृतांची संख्या ८५३ इतकी होती. आत्तापर्यंत देशात ३७ हजार ३६४ मृत्यू झाले आहेत. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६५.४३ इतके आहे.

 
Powered By Sangraha 9.0