“नियती कोणाला सोडत नाही, कुटुंबाला हिशेब द्यावा लागणार”

19 Aug 2020 14:13:15

Nilesh Rane_1  
 
मुंबई : सुशांतसिंग राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यानंतर आता या निर्णयासंदर्भात राज्यातील सत्ताधारी तसेच विरोधकांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. आता भाजप नेते निलेश राणे यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधत या कुटुंबाला याच जन्मात हिशेब द्यावा लागणार अशी टीका त्यांनी केली आहे.
 
 
 
“आयुष्यभर एका कुटुंबाने वाटेल त्याची वाट लावली, बदनामी केली, शिव्या घातल्या. हजारो कुटुंब उद्ध्वस्त केली, पण नियती कोणालाही सोडत नाही. याच जन्मात या कुटुंबाला हिशेब द्यावा लागणार. मनाला वाट्टेल तसे हे कारटे वागले, पण आता लोकांकडून फटके खायची वेळ आली,” अशी झणझणीत टीका निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमधून केली आहे.
 
 
 
दरम्यान, निलेश राणे यांचे बंधू नितेश राणे यांनीही याप्रकरणी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन प्रतिक्रिया दिली आहे. अब बेबी पेंग्विन तो गयो, असे ट्विट त्यांनी केले आहे. सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे जाताच भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0