आदित्यशी माझा काही संबंध नाही : रिया चक्रवर्ती

    दिनांक  18-Aug-2020 15:15:32
|
rhea_1  H x W:


वकीलामार्फत रियाने स्पष्ट केली आपली बाजू!

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात राज्याचे पर्यटन मंत्री, शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांचा कोणताही संबंध नाही. आदित्य ठाकरे यांना ना मी ओळखते, ना त्यांच्याशी कधी संपर्क आला. आदित्य यांच्याशी माझे फोनवर देखील बोलणे झाले नाही, असे रिया चक्रवर्तीने म्हटले आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीसह आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे आले होते.

रिया चक्रवर्तीने सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात आपल्या वकिलांच्या मार्फत एक पत्र सादर केले आहे. या पत्रात रिया हिने आदित्य यांच्याबाबत महत्त्वाचा खुलासा केला आहे. यासोबतच रियाने असेही म्हटले आहे की, सुशांत राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयद्वारे करण्यास माझा कोणताही विरोध नाही. परंतु, इथे मुद्दा कार्यक्षेत्राचा आहे. बिहार पोलीस ज्या पद्धतीने या प्रकरणावर आणि त्याच्या चौकशीवर दावा सांगतात तो चुकीचा आहे.


सुशांतने १४ जून रोजी आपल्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळला होता. सुशांतच्या मृत्यूने बॉलीवूड विश्व चांगलेच ढवळून निघाले आहे. सुशांतच्या कुटुंबियांसह काही कलाकारांनी ही हत्या असल्याचे म्हटले आहे. याचा तपास सुरु असून, सुशांतची कथित मैत्रीण रिया चक्रवर्तीची चौकशी सुरु आहे. तर हा तपास मुंबई पोलिसांऐवजी सीबीआयकडे सोपविण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे, या प्रकरणातील साक्षीदारांच्या जीवाला धोका आहे. त्यांची हत्या होऊ शकते, अशी अजब भीती सुशांतचा भाऊ आणि भाजप आमदार नीरज सिंहने व्यक्त केली आहे. तसेच मुंबई पोलीस त्यांना सुरक्षा देण्यास नकार देत आहे, असा दावा केला. आमदार नीरज सिंह बबलू यांनी सुशांत प्रकरणातील साक्षीदारांना जीवे मारण्याची धमकी येत असल्याचाही दावा केला आहे.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.