सत्यपाल मलिक मेघालयचे राज्यपाल

18 Aug 2020 12:15:46

Rajyapaal_1  H
 
 
 
 
नवी दिल्ली : गोवा राज्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याकडे आता मेघालय राज्याच्या राज्यपाल पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर महाराष्ट्राचे राज्यपाल भागातसिंग कोश्यारी हे आता गोव्याचेही कामकाज पाहणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या कार्यालयाकडून ही माहिती जाहीर करण्यात आली आहे. सत्यपाल मलिक यांना ऑक्टोबर २०१९मध्ये गोव्याच्या राज्यपाल पदावर रुजू करण्यात आले होते. त्याआधी त्यांनी काही महिने जम्मू काश्मीरचा कार्यभार सांभाळला आहे.
 
 
 
जम्मू काश्मीरमध्ये मलिक राज्यपाल असतानाच असतानाच कलम ३७० हटवण्यात आले होते. यावेळी त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. दरम्यान, सत्यपाल मलिक हाताळत असलेल्या गोव्याची जबाबदारी महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. कोश्यारी यांच्याकडे महाराष्ट्रासहीत गोव्याचा अतिरिक्त भार सोपवण्यात आला आहे. आता ते महाराष्ट्रासोबतच गोव्याचेही कामकाज हाताळणार.
Powered By Sangraha 9.0