लवकरच प्रदर्शित होणार प्रियंका चोप्राचे आत्मचरित्र!

    दिनांक  18-Aug-2020 12:00:47
|
Priyanka chopra_1 &n


ट्विटरच्या माध्यमातून प्रियंकाने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी!


मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा नेहमीच आपल्या हटके भूमिकांसाठी ओळखली जाते. मात्र प्रियंकाच्या आयुष्यातील खासगी गोष्टी माहिती करून घेण्याची नामी संधी आता तीच्या चाहत्यांना चालून आली आहे. प्रियंकाने स्वतःच्या आयुष्यावर आत्मचरित्र लिहिले असून, हे पुस्तक लवकरच प्रकाशित करण्याची घोषणाही तीने ट्विटरवरून केली आहे.


ट्विटरच्या माध्यमातून देशी गर्लने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. प्रियंकाने या पुस्तकाच्या कव्हर पेजचे छायाचित्र शेअर केले असून, हे पुस्तक लिहून पूर्ण झाले असल्याचे तिने सांगितले. ‘अनफिनिश्ड’ असे या आत्मचरित्राचे नाव असून, ते लवकरच प्रकाशित केले जाणार आहे.प्रियंकाने वयाच्या १७व्या वर्षी इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला. तिचा हा प्रवास खूपच रंजक ठरला आहे. मिस इंडिया ते बॉलिवूडची 'देसी गर्ल' होण्याचा प्रवास खूप कठीण होता. यानंतर प्रियंकाने हॉलिवूडमध्येही आपला अभिनय दाखविला. आज ती इंडस्ट्रीच्या प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये एक आहे. प्रियंकाचे चाहते तिचे पुस्तक वाचण्यासाठी खूप उत्सुक आहेत.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.