हीच तुझी धर्मनिरपेक्षता का?; कंगना राणावतचा आमीर खानला सवाल!

    दिनांक  18-Aug-2020 12:06:22
|
kangana_1  H x


आमीरचा तुर्की दौरा ठरतोय वादग्रस्त!


मुंबई : अभिनेता आमीर खान तुर्कीच्या फर्स्ट लेडीला भेटल्यामुळे सोशल मीडियावर त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. अशातच अभिनेत्री कंगना राणावतने आमीर खानवर जोरदार टीका केली आहे.


हिंदुत्वाकडे माझा कल असला तरी माझ्या मुलांना मात्र मी संपूर्ण सक्तीने इस्लाम अंगीकारण्याचा सल्ला देतो. मी आणि माझी पत्नी आम्ही दोघेही आपआपल्या पद्धतीने जगतो, असे आमीर त्याच्या एका जुन्या मुलाखतीत बोलला होता. त्याच्या वादग्रस्त तुर्की भेटीनंतर कंगनाने या मुलाखतीवरून आमीर खानला चांगलेच बोल सुनावले आहेत.


‘हिंदू + मुस्लिम = मुस्लिम. हा तर कट्टरवाद आहे. दोन वेगवेगळ्या धर्मात लग्न करण्याचा अर्थ हा होत नाही की जीन्स आणि रितीरिवाजांचे मिलन होईल. दुसऱ्या धर्माच्या व्यक्तिसोबत लग्न करण्याचा अर्थ खरे तर दोन धर्मांचे मिलन असा होता. हीच तुझी धर्मनिरपेक्षता आहे का? मुलांना अल्लाची इबादतही शिकवा आणि श्रीकृष्णाची भक्तीही’, असे कंगनाने म्हटले आहे.
‘लालसिंग चढ्ढा’ या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने तुर्कीत असलेल्या अभिनेता आमीर खानने तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तैय्यप एर्दोगान यांची पत्नी आणि देशातील पहिली महिला एमीन एर्दोगान यांची भेट घेतली. इस्तंबूलमधील प्रेसिडेन्शिअल पॅलेस ह्युबर मॅन्शन येथे झालेली ही भेट सध्या वादग्रस्त ठरत आहे. या भेटीमुळे आमीरचे चाहते प्रचंड नाराज झाले आहेत.


भारतविरोधी भूमिका घेणाऱ्या तुर्कीच्या या कुटुंबाला आमीरने भेट दिल्याने त्याच्या चाहत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भारताच्या स्वातंत्र्यदनाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत, मात्र तुर्कीच्या प्रथम महिलेला भेटण्यास आमीरकडे खूप वेळ होता. भारत असहिष्णू वाटणाऱ्या आमीर आणि किरण यांना आपले दुसरे घर बसविण्यासाठी जागा मिळाल्याचे म्हणत, आमीरवर जोरदार टीका केली आहे. तर काही जणांनी त्याच्या या कृतीमुळे ‘लालसिंग चढ्ढा’ या त्याच्या आगामी चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली आहे.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.