राहुल गांधी, सोनिया गांधी तुम्ही चीनकडून पैसे घेतले!

18 Aug 2020 09:43:18

jp nadda_1  H x



भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची कॉंग्रेसवर टीका!


नवी दिल्ली : सोनिया आणि राहुल गांधी यांनी राष्ट्रीय हिताकडे दुर्लक्ष करत चीनकडून पैसे घेतले आहेत. यापेक्षा कुणी खालच्या पातळीवर जाऊ शकत का, अशा शब्दात भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गांधी कुटूंबीयावर निशाणा साधला आहे.


अमेरिकेतील वॉल स्ट्रीट या वृत्तपत्राच्या बातम्यांचा हवाला देत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी फेसबुक व व्हॉट्सअप या समाजमाध्यमांवर भाजपचे नियंत्रण असल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपांचे खंडन करताना नड्डा यांनी आता राहुल गांधींवर शाब्दिक तोफ डागली आहे. सोशल मीडियाचा गैरवापर आणि पीएम केअर्स फंडाबद्दल राहुल गांधी यांनी वृत्तपत्रातल्या काही बातम्यांचा आधार घेत प्रश्न विचारले होते. त्यावरून नड्डा यांनी राहुल गांधी, सोनिया गांधी आणि काँग्रेसवर आरोप केले आहेत.







नड्डा यांनी ट्विटरवरून म्हटले की, देश कोरोनाशी दोन हात करण्यात हातभार लावत असताना राहुल गांधी मात्र फेक न्यूज पसरविण्याचे काम करत आहेत. राहुल यांचे करियरच या खोट्या बातम्या पसरविण्यात गेले आहे.


तसेच देशाचा पंतप्रधान मोदींवर पूर्ण विश्वास आहे. सरकारकडे पीएम केअर फंडातील प्रत्येक पैशाचा हिशोब आहे. लोकांच्या हितासाठीच हा सर्व पैसा वापरण्यात येत आहे, असेही नड्डा यांनी यावेळेस स्पष्ट केले आहे.




Powered By Sangraha 9.0