शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे निधन

    दिनांक  17-Aug-2020 18:54:16
|

pandit jasraj_1 &nbsन्यू जर्सी :
पंडित जसराज यांचे निधन झाले आहे. ते ९० वर्षांचे होते. अमेरिकेत त्यांनी शेवटचा श्वास घेतल्याची माहिती आहे. पं.जसराज यांना भारतीय शास्त्रीय संगीतातील संगीत मार्तंड म्हटले जाते. शास्त्रीय संगीतातील मेवाती घराण्याचे तपस्वी गायक अशी पंडित जसराज यांची ओळख होती. पंडित जसराज यांचा जन्म २८ जानेवारी १९३० साली झाला. वयाच्या चौथ्या वर्षांपासूनच त्यांनी वडील पंडित मोतीराम यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे गिरवायला सुरुवात केली. त्यांचे मोठे बंधू मणिरामजी यांनी त्यांना गाणे शिकवले. भारत सरकारने २००० मध्ये संगीत क्षेत्रातल्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौवरले होते. पंडित जसराज हे मूळचे तबलजी होते. गायकाच्या तुलनेत इतर साथीदारांना दुय्यम समजले जाते हे समजल्याने त्यांनी तबला वादन सोडून गायक बनायचे ठरवले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.