मुंबई : डॉक्टरांपेक्षा कम्पाऊंडरला जास्त कळतं!, असे म्हणणाऱ्या खासदार संजय राऊत यांचा नेटकऱ्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. संजय राऊतांच्या मुलाखतीनंतर यावरून अनेक मिम्स व्हायरल होत आहेत.
तसेच कोरोना योद्धा असणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची खिल्ली उडवल्याबद्दलही त्यांच्यावर टीका केली जात आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण देत मी डॉक्टरांचा कसल्याही प्रकारे अवमान केला नाही, असेही म्हटले
गेल्या आठवडाभर संजय राऊत, डॉक्टर्स आणि कम्पाऊंडर्स याबद्दलचे भन्नाट मिम्स व्हायरल झाले होते. नेटीझन्सनी त्यांच्या वक्तव्यावरून अनेक कल्पक मिम्स शेअर केले होते. यापूर्वीही अशाच प्रकारे संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीत ठाकरे जागतिक आरोग्य संघटनेला सल्ला देतात, असे म्हटल्यानंतर त्यांच्यावर टीका झाली होती.