सांगली, कोल्हापूरमध्ये पूरपरिस्थिती ; कृष्णा, कोयनाची पाणीपातळी वाढली

17 Aug 2020 13:13:57

Sangli_1  H x W
 
सांगली : गेले काही दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सांगलीत कृष्णा नदीची पाणीपातळी ३२ फुटांवर गेल्याने नदीकाठच्या सखल भागात पुराचे पाणी शिरले आहे. तर दुसरीकडे, कृष्णा नदीसह वारणा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढल्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या १०४ गावातील ग्रामस्थांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
 
 
कोयना धरणातून पाणी सोडल्यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली. सांगली शहराजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी ३१.७ फुटांवर पोहचली. सूर्यवंशी प्लॉटमधील ४ घरांमध्ये कृष्णा नदीचे पाणी शिरले. सूर्यवंशी प्लॉटमधील १० कुटुंबातील ४० लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे. तसेच कोल्हापूरमधील धारण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. राधानगरी धरणाच्या ४ दरवाजांमधून ७ हजार ११२ क्यूसेक्सचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फूट ६ इंचावर आली आहे. जिल्ह्यातील ७६ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0