'लय भारी', 'दृश्यम' फेम दिग्दर्शक निशिकांत कामत यांची प्रकृती नाजूक

17 Aug 2020 11:59:00
Nishikant kamat_1 &n



प्रकृती गंभीर झाल्याने निशिकांत कामत व्हेंटीलेटरवर!


मुंबई : ‘डोंबिवली फास्ट’, ‘लय भारी’ यासारख्या सुपरहिट चित्रपटांचे मराठमोळे दिग्दर्शक निशिकांत कामत यांची प्रकृती आज अधिक खालावली असून त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. लिव्हर अर्थात यकृताशी संबंधित आजारामुळे निशिकांत कामत यांची प्रकृती बिघडली होती. त्यांच्यावर हैदराबादमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती आहे. दरम्यन, रितेश देशमुख यांनी याबद्दल ट्विट करत माहिती दिली आहे.  


निशिकांत कामतने ‘डोंबिवली फास्ट’, ‘लय भारी’, ‘फोर्स’, ‘मुंबई मेरी जान’ यासारख्या हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. याशिवाय ‘सातच्या आत घरात’, ‘रॉकी हॅण्डसम’, ‘जुली २’, ‘मदारी’, ‘भावेश जोशी’ सारख्या हिंदी-मराठी चित्रपटात अभिनय केला.


अजय देवगणचा ‘दृश्यम’ सिनेमा दिग्दर्शित केल्यानंतर प्रकृतीच्या कारणांमुळे त्यांनी दिग्दर्शन थांबवून केवळ अभिनेता म्हणूनच काम केले. निशिकांत कामत यांनी ‘डोंबिवली फास्ट’ या मराठी चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला. त्यानंतर त्यांनी मुंबई बॉम्बस्फोटावर आधारित हिंदीतील ‘मुंबई मेरी जान’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. त्यानंतर निशिकांत कामतने ‘दृश्यम’, ‘मदारी’, ‘फुगे’ यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शनदेखील केले होते.


लिव्हर सोरायसिस या आजाराशी निशिकांत कामत गेल्या काही काळापासून झगडत आहेत. यातून ते बरेही झाले होते, मात्र काही कालावधी नंतर त्यांना पुन्हा हा त्रास सुरु झाला.  हा त्रास वाढल्याने त्यांना हैदराबादमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आठवडाभर या आजाराशी झुंज देताना त्यांची प्रकृती गंभीर झाली आहे. सोमवारी सकाळी त्यांना लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आले असून, त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना त्यांच्या चाहत्यांकडून केली जात आहे.










Powered By Sangraha 9.0