'धोनी एक उत्तम लीडर ; २०२४ची लोकसभा निवडणूक लढवावी'

16 Aug 2020 15:38:15

MSD_1  H x W: 0



नवी दिल्ली :
भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. निवृत्तीची ही घोषणा त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून केली आहे. निवृत्तीनंतर भाजपाचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी धोनीला निवडणूक लढण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, धोनीने अद्याप यावर कोणतेही स्पष्टीकरण दिले नाहीये.





भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी रविवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवर महेंद्रसिंह धोनीला सल्ला देणारे ट्विट केले. यामध्ये "एमएस धोनी क्रिकेटमधून निवृत्त होत आहे, पण दुसर्‍या कशापासून नाही. आव्हानांसोबत लढा देण्याची त्याची प्रतिभा आणि त्याने क्रिकेटमध्ये दाखविलेल्या संघाचे नेतृत्व करण्याची क्षमता सार्वजनिक जीवनात आवश्यक आहे. त्याने २०२४मध्ये लोकसभा निवडणूक लढवावी," असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. दरम्यान, महेंद्रसिंग धोनीने शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.धोनीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व फोटो पोस्ट केले आहे. तसेच, या व्हिडीओला 'मैं पल दो पल का शायर हूँ,' हे गाणं शेअर करत निवृत्तीची घोषणा केली आहे. "तुम्ही दिलेलं प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आभारी आहे…१९२९(म्हणजे संध्याकाळी ७.३० ) पासून मला निवृत्त समजावे," अशी कॅप्शन त्याने या पोस्टला दिली आहे.गेल्या अनेक दिवसांपासून धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू होत्या.
Powered By Sangraha 9.0