कॅलिफोर्निया स्टेट असेंब्लीने घेतली सुशांतच्या अभिनयाची दाखल!

    दिनांक  15-Aug-2020 16:35:32
|
sushant_1  H x

कॅलिफोर्निया स्टेट असेंब्लीकडून सुशांतला मरणोत्तर पुरस्कार!

मुंबई : अत्यंत कमी वयात विविध विषय हाताळलेला कलाकार म्हणून कॅलिफोर्निया स्टेट असेंब्लीने सुशांतचा गौरव केला आहे. त्याचे चित्रपटसृष्टीतले योगदान आणि त्याची सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन त्याला कॅलिफोर्निया स्टेट असेंब्लीकडून प्रमाणपत्र देण्यात आले आहे. त्याची बहीण श्वेता सिंग किर्ती हिने सोशल मिडीयावर या प्रमाणपत्राचा फोटो टाकून त्यांचे आभार तर मानलेच. शिवाय, कॅलिफोर्निया आमच्यासोबत आहे आणि तुम्ही? असा प्रश्नही विचारला आहे.


कॅलिफोर्निया राज्य विधानसभेने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या अभिनयाची दाखल घेऊन मरणोत्तर पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. सुशांतची बहिण श्वेता सिंग किर्ती हिने सुशांतच्यावतीने हा पुरस्कार स्विकारला आहे. सुशांतने अभिनयासह अनेक सामाजिक कार्यांमध्ये देखील योगदान देले होते. त्याच्या या कार्याचे कौतुक म्हणून त्याचा मरणोत्तर सन्मान करण्यात आला आहे.


“स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कॅलिफोर्नियाने माझ्या भावाचा म्हणजेच सुशांत सिंह राजपूतचा सन्मान केला आहे. कॅलिफोर्निया आमच्या सोबत आहे…तुम्ही आहात का? कॅलिफोर्नियाने आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद.”, असे म्हणत ट्विटरद्वारे श्वेता हे प्रमाणपत्र पोस्ट केले आहे


१४ जून रोजी सुशांतने आत्महत्या केली. सुशांत आत्महत्या प्रकरणात आत्तापर्यंत मुंबई पोलिसांकडून अनेक लोकांची चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान सध्या मुंबई पोलीस, बिहार पोलीस आणि ईडीच्या माध्यमातून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.