पूरग्रस्त आसाम-बिहारला अक्षय कुमारकडून मदतीचा हात!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Aug-2020
Total Views |

Akshay kumar _1 &nbs


अक्षयकडून बिहार-आसाम मुख्यमंत्री सहायतानिधीला १-१ कोटींची मदत!


मुंबई : बॉलीवूडचा खिलाडी कुमार नेहमीच जनतेच्या मदतीला तयार असतो. संकटसमयी अक्षय नेहमीच मदतीला तत्पर असतो. कोरोना महामारीच्या या काळातही अक्षयने ‘पीएम केअर्स’ फंडाला २५ कोटींचा मदत निधी सुपूर्द केला होता. भारताच्या ७४व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने त्याने आसाम आणि बिहार या पूरग्रस्त राज्यांना मदत्ची हात दिला आहे. पूरग्रस्त आसाम आणि बिहारच्या मुख्यमंत्री सहायता निधीला अक्षय कुमारने प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत दिली आहे. १३ ऑगस्ट रोजी अक्षयने या संदर्भात दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. या मदतीसाठी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी त्याचे आभार मानले आहेत.


कोरोना महामारीच्या काळात त्याने महाराष्ट्र सरकारला त्याने मास्क, पीपीई आणि रॅपिड फायर किट्स खरेदी करण्यासाठी बीएमसीला ३ कोटी रुपये मदत निधी दिला होता. त्याने मुंबई पोलिस फाऊंडेशनमध्ये दोन कोटींची मदत केली. इतकेच नव्हे तर दैनंदिन मजुरांच्या मदतीसाठी सिने आणि टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन (सिंटा)ला ४५ लाख रुपये दिले होते.


अलीकडेच, फोर्ब्स मासिकाने २०२० मधील जगातील सर्वाधिक कमाई करणार्‍या कलाकारांची यादी जाहीर केली. या यादीत बॉलिवूडमधून एकट्या अक्षय कुमारला स्थान मिळाले आहे. त्याची कमाई ३६२ कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते आणि या यादीत तो सहाव्या क्रमांकावर आहे. कमाईच्या बाबतीत त्याने लिन मॅन्युएल, विल स्मिथ, अ‍ॅडम सँडलर आणि जॅकी चॅन या परदेशी कलाकारांना मागे टाकले आहे. त्याची ही कमाई बर्‍याच ब्रँड अ‍ॅन्डॉर्समेंटमधून झाली आहे, असे म्हटले जाते.


कोरोना विषाणूमुळे झालेल्या लॉकडाऊनच्या आधी अक्षयच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता, प्रेक्षकांनाही हा ट्रेलर चांगलाच आवडला होता. परंतु, लॉकडाऊनमुळे हा चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. दीपावलीच्या निमित्ताने रोहित शेट्टी दिग्दर्शित अक्षयचा हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे समजते आहे. ‘सूर्यवंशी’च्या प्रदर्शनाबरोबरच अक्षय सध्या निखिल अडवाणीच्या निर्मितीमध्ये तयार होत असलेल्या ‘बेलबॉटम’ चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी अक्षय सध्या यूकेमध्ये आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी उन्हाळ्यात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.




@@AUTHORINFO_V1@@