'सडक २'ला विश्व हिंदू परिषदेचाही विरोध

    दिनांक  14-Aug-2020 12:46:59
|

sadak 2_1  H x


मुंबई :
सुशांत सिंह राजपूत आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये नेपोटिझमवरुन वाद सुरु आहे. यात अभिनेत्री आलिया भट्टला वारंवार विरोधाचा सामना करावा लागत आहे. अशातच महेश भट्ट यांच्या 'सडक २' ला बायकॉट करण्याची मोहिमच सुरु झाली आहे. याचाच प्रत्यय यूट्यूबवर सिनेमाच्या ट्रेलरला सर्वाधिक नापसंतीच्या माध्यमातून दिसून आला आहे. आता या चित्रपटाला विश्व हिंदू परिषदेने देखील विरोध केला आहे. हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप विहिंपने केला आहे.

विश्व हिंदू परिषदेचे प्रचार प्रमुख विजय शंकर तिवारी यांनी यासंदर्भात एक ट्वीट केले आहे. यात ते म्हणतात, ''महेश भट्ट यांच्या दिग्दर्शनात बनलेला चित्रपट सडक २ मध्ये हिंदू आस्थेला अपमानित केले आहे. हा चित्रपट हॉटस्टारवर दाखवला जाणार आहे. या चित्रपटात केवळ नेपोटिझमचे प्रोडक्ट्स भरलेले आहेत. ज्याला महेश भट्ट पुढे करत आहेत. केंद्र सरकार यावर कारवाई करावी", असे ते म्हणाले. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आलिया भट्टचा एक संवाद आहे. ज्यात ती म्हणतेय की, 'फेक गुरुंमुळे मी खूप काही गमावले आहे.' यावरुन हा वाद सुरु झाला आहे. नेपोटिझमने भरलेला हा चित्रपट न पाहण्याचे संकेत प्रेक्षक ट्रेलर डिसलाईक करुन देत आहेत. सोशल मीडियार या चित्रपटाच्या ट्रेलरवर कठोर शब्दा कमेंट आणि टिप्पणी केली जात आहे. यावरुनच त्यांची नाराजी स्पष्ट होत आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.