न्यायालय अवमानना प्रकरणी प्रशांत भूषण दोषी

14 Aug 2020 13:09:32

prashant bhushan_1 &


नवी दिल्ली :
सर्वोच्च न्यायालयाने वकील प्रशांत भूषण यांना अवमानना प्रकरणात दोषी करार दिला आहे. त्यांच्या शिक्षेवर येत्या २० ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या चार माजी सरन्यायाधीशांवर कथितरित्या आक्षेपार्ह ट्विट केले होते. याला 'कंटेम्ट ऑफ कोर्ट' (कायद्याचा अवमान) मानण्यात आले.

या प्रकरणात न्यायपालिकेने संज्ञान घेतले होते. न्यायमूर्ती अरुण मिश्रा, न्यायमूर्ती बी आर गवई आणि न्यायमूर्ती कृष्ण मुरारी यांच्या पीठाने या प्रकरणात भूषण यांना दोषी करार दिला आहे. 'माजी १६ सरन्यायाधीशांमध्ये निम्म्याहून अधिक सरन्यायाधीश भ्रष्ट होते' असे प्रशांत भूषण यांनी २००९ मध्ये म्हंटले होते. यावर, प्रशांत भूषण यांच्या या वक्तव्यामुळे प्राथमिकदृष्ट्या न्यायालयाचा अवमान होतो का ? हे पहिले जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. आता या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने प्रशांत भूषण यांना अवमानना करण्यासाठी दोषी ठरवले आहे.
Powered By Sangraha 9.0