पाकिस्तानचे स्वातंत्र्य : एक अपयश

14 Aug 2020 23:32:36


Pakistan_1  H x
 
 

पाकिस्तान हे सगळ्याच आघाड्यांवर अपयशी ठरलेले राष्ट्र आहे. पण, स्वत:च्या अनैसर्गिक जन्माचा दिवस कोणता, हे ठरवण्याबाबतही पाकिस्तान अपयशीच ठरले. आजही पाकिस्तानातले खूप सारे विचारवंत पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट म्हणूच साजरा करतात. पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनाबाबत सांगताना तिथे काय सांगितले जाते, तर पाकिस्तानने ब्रिटिशांविरूद्ध लढून पाकिस्तान स्वतंत्र केला. भारतामध्ये निर्मम हिंसा, हत्याकांड, क्रूरता करत धर्माच्या नावावर अधर्म करत पाकिस्तान नामक एक तुकडा भारतापासून वेगळा झाला, हे तिथे सांगितले जात नाही.


 

पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन हा १४ ऑगस्ट नसून १५ ऑगस्टच आहे. कारण, १८ जुलै, १९४७ रोजीचे भारतीय स्वातंत्र्याबद्दल त्याकाळच्या ब्रिटिश पार्लमेंटमध्ये उद्गार आहेत की, १५ ऑगस्ट, १९४७ सालापासून भारत आणि पाकिस्तान असे दोन स्वतंत्र देश निर्माण होणार आहेत. तसेच जुलै १९४८ ला पाकिस्तानने स्वातंत्र्य स्मरण म्हणून एक स्टॅम्प प्रकाशित केला. त्या स्टॅम्पवरही १५ ऑगस्ट, १९४७ साल हाच पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन म्हणून लिहिले होते. पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन हा १४ ऑगस्ट नसून १५ ऑगस्टच आहे. पण, भारतासोबत आपले काहीही नको म्हणून १५ ऑगस्टऐवजी पाकिस्तान १४ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. हे म्हणणे आहे, पाकिस्तानच्या शाहिदा काझी या पाकिस्तानी विचारवंत पत्रकार महिलेचे. द एक्सप्रेस ट्रिब्युनला दिलेल्या मुलाखतीमध्ये शाहिदा आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ इतरही अनेक पुरावे देतात. अर्थात, पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन कोणताही असो, आपलयला काय करायचे आहे म्हणा. पण, असे असतानाही शाहिदा काझी यांचे विधान सांगावेसे वाटले. कारण, पाकिस्तान हे सगळ्याच आघाड्यांवर अपयशी ठरलेले राष्ट्र आहे. पण, स्वत:च्या अनैसर्गिक जन्माचा दिवस कोणता, हे ठरवण्याबाबतही पाकिस्तान अपयशीच ठरले. आजही पाकिस्तानातले खूप सारे विचारवंत पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट म्हणूच साजरा करतात.



पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनाबाबत सांगताना तिथे काय सांगितले जाते, तर पाकिस्तानने ब्रिटिशांविरूद्ध लढून पाकिस्तान स्वतंत्र केला. भारतामध्ये निर्मम हिंसा, हत्याकांड, क्रूरता करत धर्माच्या नावावर अधर्म करत पाकिस्तान नामक एक तुकडा भारतापासून वेगळा झाला, हे तिथे सांगितले जात नाही. पाकिस्तानच्या शालेय इतिहासात तर अजूनच वेगळे सांगितले जाते. त्यात लिहिले आहे की, अरबस्तान ते बांगला पूर्णत: मुस्लीम अनुशासित राज्य होते. मग इंग्रजानी पारतंत्र्य लादले. मुस्लीम सत्ताधीश इंग्रजांशी लढले. स्वातंत्र्य मिळवले आणि मग हिंदुस्तान त्यातून वेगळा झाला. आता हा इतिहास वाचून कोणत्याही भारतीयाच्या डोळ्यांपुढे काजवे नक्के चमकतील. पण, पाकिस्तान म्हटले म्हणजे अशा उलट्यासुलट्या घटना इतिहासात घडायच्याच. अर्थात, स्वातंत्र्याचा असा इतिहास सांगण्यामागे पाकिस्तान्यांचा हेतू काय? तर, पाकिस्तानी लोकांना कधीही वाटू नये की, आपण कधीकाळी भारताचे अभिन्न भाग होतो. असो. पाठ्यपुस्तकात असा खोटा इतिहास शिकवला तरी बलुचिस्तान, सिंध वगैरे वगैरेंना मात्र आजही पक्के माहिती आहे की, ते भारतीय संस्कृतीचेच वारसदार आहेत. त्यामुळे पाकिस्तानला त्यांनी कधीही आपला देश मानलेच नाही.
आजचा पाकिस्तान खरेच स्वतंत्र आहे का, हासुद्धा एक गहन चर्चेचा विषय आहे. कारण, १९४७ स्वतंत्र झालेल्या देशाला आजही स्वत:चे असे एकही धोरण नाही. चीनच्या कर्जकचाट्यात सापडल्याने चीनसमोर सर्वच बाबींबाबत नांगी टाकणे हे एकच धोरण पाकिस्तान सध्या राबवित आहे. पाकिस्तानने स्वता:ला स्वतंत्र समजणे हाच एक विनोद आहे. कारण, जागतिक घडामोडींकडे पाहिले तर वाटते की, पाकिस्तान हा चीनचा मांडलिक देश आहे. चीनच्या पारतंत्र्यात आहे. कारण, पाकिस्तान म्हणजे इस्लामच्या नावावर भारतापासून वेगळा झालेला हा एक जमिनीचा तुकडा. या जमिनीच्या तुकड्याचा इतिहास, संस्कृती आणि सगळ्यांचीच नाळ भारतीयत्वाशी जुडलेली. वेगळे निघाल्यानंतर पाकिस्तानच्या सरकारने भारतीयत्वाला नाकारले. तसेच त्यांच्या ‘कायदे आझम’चे म्हणजे जिनांचे विचार बासनात गुंडाळले आणि ‘कट्टरपंथीय मुस्लीम देश’ अशी स्वत:ची ओळख केली. स्वतंत्र मुस्लीम देश म्हणून जगभर स्वत:ला प्रदर्शित केले. पण, चीनने या पाकिस्तानमधील चिनी कंपन्यांमध्ये मुस्लीम कामगारांना नमाज पढण्यास बंदी घातली. पाकिस्तानातील हजारो मुलींना चीनमध्ये देहविक्रीसाठी विकले गेले. उघूर मुस्लीम आणि चीन हा विषयही जगभर माहिती आहे. पण, या सगळ्या गोष्टींबाबत पाकिस्तानने चीनला एका शब्दानेही पुनर्प्रश्न केला नाही. कारण, चीनच्या जीवावर पाकिस्तान श्वास घेत आहे. गरिबी, भ्रष्टाचार, दहशतवाद यांनी पाकिस्तान पुरता पोखरलेला आहे. आपण एक स्वतंत्र देश आहोत, हे सांगण्याचे एकच प्रमाण पाकिस्तानकडे आहे. ते म्हणजे, भारताविरोधी कारवाया करणे. अर्थात, त्या कारवाया पाकिस्तानच्याच अंगाशीच येतात, तर अशा या पाकिस्तानचे स्वातंत्र्य म्हणजे एक अपयशच आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0