अमेरिकेतील भारतीयांसाठी खुशखबर ! एच -1 बीच्या अटी शिथिल

13 Aug 2020 17:21:29

trump _1  H x W



वॉशिंग्टन :
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच १ बी व्हिसाच्या अटींमध्ये शिथिलता आणली आहे. ज्याचा फायदा अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीय नागरिकांना होणार आहे. मात्र, अमेरिकेत प्रवेश केवळ त्या नागरिकांना दिला जाणार आहे जे व्हिसा बंदी जाहीर होण्यापूर्वी कार्यरत होते आणि पुन्हा त्याच ठिकाणी रुजू होऊ इच्छित आहेत. नवीन येणाऱ्यांसाठी नियमात बदल नाही हे परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


अमेरिकन परराष्ट्र विभागाच्या सल्लागारांनी सांगितले की, अवलंब केलेल्या (जोडीदार आणि मुले) यांना प्राथमिक व्हिसाधारकांसह अमेरिकेत प्रवेश करण्याची परवानगी दिली जाईल. विभागीय सल्लागारांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प प्रशासनाने तांत्रिक तज्ञ, ज्येष्ठ-स्तरीय व्यवस्थापक आणि एच -१ बी व्हिसा धारक व इतर कामगारांना ही परवानगी दिली. अमेरिकेचा कोरोनामुळे बिघडलेला आर्थिक गाडा रुळावर आणण्यासाठी अटींमध्ये ही शिथिलता देण्यात आली आहे. तसेच प्रशासनाने आरोग्यसेवेत कार्यरत असणाऱ्या व कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मदत करणाऱ्या व्हिसाधारक आरोग्यसेवक व संशोधकांनाही वैद्यकीय संशोधन करण्याची व अमेरिकेत येण्यासाठी परवानगी देखील दिली आहे.
Powered By Sangraha 9.0