मुकेश अंबानी करणार टीकटॉकमध्ये गुंतवणूक?

13 Aug 2020 18:40:35
tik tok _1  H x
 
 
 
 
 
नवी दिल्ली : युझर्सद्या दृष्टीकोनातून बाजारपेठेचा सर्वात मोठा दुसरा हिस्सा असणाऱ्या भारतात टिकटॉक पुन्हा पाऊल ठेवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. टिकटॉकची पॅरेंट कंपनी भारतात आपला हिस्सा विकण्याच्या प्रयत्नात आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बाईट डान्स आपला भारतीय बाजारपेठेतील हिस्सा मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला विकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी दोन्ही कंपन्यांमध्ये जुलै महिन्यात चर्चा झाली होती. दरम्यान, अद्याप कुठल्याही गोष्टींवर ठोस निर्णय झालेला नाही. यावर दोन्ही कंपन्यांनी कुठलेही अधिकृत विधानही केलेले नाही.
 
 
 
लडाखमध्ये गलवान खोऱ्यात सीमावाद झाल्यानंतर केंद्र सरकारने चीनच्या ५९ अॅप्सवर बंदी आणली आहे. टिकटॉक, व्हीचॅट, अलिबाबा ग्रुपचे युसी ब्राऊझर सारख्या अॅप्सवरही बंदी आणली आहे. यानंतर जुलै महिन्यातही चीनच्या ४७ अॅप्सवर बंदी आणली आहे. आत्तापर्यंत एकूण १०६ चीनी अॅप्स बंद करण्यात आले आहेत. टिकटॉकची भारतीय बाजारपेठेतील हिस्सेदारी ३ दशलक्ष डॉलर इतकी आखण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0