स्वातंत्र्यदिनी अमेरिकेत टाईम्स स्केवअरवर फडकणार तिरंगा!

12 Aug 2020 17:14:35
Times square _1 &nbs





मुंबई : भारताच्या ७४व्या स्वातंत्र्यदिनी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात टाइम्स स्क्वेअरवर तिरंगा फडकणार आहे. भारताच्या स्वातंत्र्यदिनाचा उत्सव अमेरिकेत ध्वजारोहण करून साजरा करण्यात येणार आहे. मुख्य म्हणजे एखाद्या देशाने एखाद्या देशाचा ध्वज फडकावून भारतीय स्वातंत्र्यदिन साजरा करणे हे पहिल्यांदाच घडत आहे.


५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा ऐतिहासिक सोहळा पार पडल्यानंतर अमिरेकेतील न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरला राम मंदिराचा फोटो झळकला होता. अमेरिकेतील फेड्रेशन ऑफ इंडियन असोसिएशनने यासंदर्भातील माहिती दिली.


आम्ही इतिहास घडवणार आहोत, असे म्हणत ‘१५ ऑगस्ट २०२० रोजी टाइम्स स्क्वेअरवर तिरंगा फडवणार आहोत,’ असे अमेरिकेतील न्यूयॉर्क, न्यू जर्सी आणि कॉन्टेकट या तीन राज्यांमधील भारतीयांचा समावेश असणाऱ्या एफआयएने जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे. ‘इतिहासामध्ये पहिल्यांदाच भारताचा तिरंगा या जगप्रसिद्ध ठिकाणी फडकवला जाणार असल्याचा आनंद आहे’, असे एफआयने आपल्या पत्रात म्हटले आहे. तर, न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासचे रणधीर जैसवाल हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या संदर्भातील माहिती एफआयएचे माजी अध्यक्ष अशोक कुमार यांनी ट्विटवरून दिली.



Powered By Sangraha 9.0