ससून बंदरावर आढळला २५ फुटी मृत व्हेल शार्क; कारवाईची गरज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Aug-2020
Total Views |

whale shark _1  


वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत संरक्षित

 
 
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबईतील ससून बंदरावर आज सकाळी २५ फुटांचा मृत व्हेल शार्क मासा आढळून आला. बंदरावर हा मासा वाहून आणलेल्या बोटीविषयी माहिती मिळाली नाही. 'वन्यजीव संरक्षण कायद्या'अंतर्गत व्हेल शार्क संरक्षित असल्याने या प्रकरणाची अधिक चौकशी करणे आवश्यक आहे. 
 
 

 
 
 
महाराष्ट्रातील प्रमुख मासेमारी बंदर असलेल्या ससून डाॅकवर आज पहाटे व्हेल शार्क प्रजातीचा मासा आढळून आला. ट्राॅलर बोटीवर मासेमारीसाठी वापरण्यात येणाऱ्या जाळीवर या माशाला ठेवण्यात आले आहे. त्यामुळे ट्राॅलर बोटींमध्येच हा मासा सापडल्याची दाट शक्यता आहे. हा मासा बंदरावर कोणी आणला, याविषयी अजूनही माहिती मिळाली नाही. समुद्रात अधिवास करणाऱ्या माशांमध्ये व्हेल शार्क हा सर्वात मोठा मासा आहे.
 
 
 
 
'वन्यजीव संरक्षण कायद्या'च्या प्रथम श्रेणीत व्हेल शार्कला संरक्षण मिळाले आहे. म्हणजेच त्याला वाघाऐवढे संरक्षण आहे. त्यामुळे ससून बंदारात आढळलेल्य व्हेल शार्कविषयी चौकशी होणे आवश्यक आहे. याविषयी आम्ही मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त अतुल पाटणे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, या प्रकरणाची आम्ही सखोल चौकशी करणार आहोत. वन विभागाच्या 'कांदळवन कक्षा'चे अधिकारी देखील घटनास्थळी पोहोचले असून ते या प्रकरणाची माहिती घेत आहेत. बऱ्याचदा मासेमारीच्या जाळ्यात अनावधाने सापडलेल्या व्हेल शार्कसारख्या माशांना मच्छीमारांकडून समुद्रात पुन्हा सोडले जाते. परंतु, या घटनेत मासा बंदरावर आढळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

@@AUTHORINFO_V1@@