तुम्ही जिम सुरू करा, पुढचं मी बघतो ! : राज ठाकरे

    दिनांक  11-Aug-2020 12:02:53
|
Raj Thackeray_1 &nbs
 
 


मुंबई : राज्यात लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या जिम सुरू व्हाव्यात यासाठी बॉडी बिल्डर आणि जिम मालक संघटना पदाधिकारी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. सहा महिन्यांपासून बंद असणाऱ्या जिम पुन्हा सुरू व्हाव्यात या मागणीसंदर्भात त्यांनी यावेळी चर्चा केली. यावेळी केंद्राच्या नियमावलीनुसार जिम सुरू कराव्यात, स्वच्छता व सॅनिटायझेशनची काळजी घेऊन व्यायामशाळा सुरू करा, असे आवाहन राज ठाकरे यांनी सर्वांना दिले आहे.
  
 
 
 
 
 
राज ठाकरे म्हणाले, "तुम्ही केंद्राच्या नियमावलीनुसार व्यायामशाळा सुरू करा. किती दिवस लॉकडाऊनमध्ये घालवणार, लोक त्यांची काळजी घेतील, तुम्हीही खबरदारी बाळगा. याबाबत मी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांचेही मत हेच आहे. आम्ही याबद्दल सरकारकडे म्हणणे मांडू" राज ठाकरे यांच्या पाठींब्यानंतर जिम मालकांनी त्यांचे आभार मानले आहेत.
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.