जम्मू काश्मीरमध्ये 4G इंटरनेट सेवा सुरू होणार !

11 Aug 2020 18:26:13

internet_1  H x
 


नवी दिल्ली : केंद्र सरकारने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात जम्मू-काश्मीरमध्ये इंटरनेट सेवा पुन्हा सुरू करणाऱ्या समितीने काही निर्णय घेतले आहेत, अशी माहिती दिली. समितीने जम्मू काश्मिरच्या प्रत्येक जिल्ह्यात 4G सेवा प्रायोगिक तत्वावर सुरू करणार असल्याचा प्रयत्न असल्याचेही प्रयत्न आहेत.
 
 
 
सर्वोच्च न्यायालयाने ही चांगली सुरुवात आहे, असे म्हटले. जम्मू काश्मीरात इंटरनेट सेवा देण्याच्या सुनावणीवर न्यायमूर्ती एन.व्ही.रमण्णा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. केंद्रातर्फे अटॉर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांनी उत्तरे सादर केली. 4G इंटरनेट सेवा कधी सुरू होईल, असा प्रश्न न्यायालयातर्फे विचारण्यात आला होता.
 
 
 
१५ ऑगस्टनंतर काही भागांमध्ये ही सेवा सुरू केली जाईल. दोन महिन्यांनी नियंत्रित स्वरुपात सेवा सुरू झाल्यानंतर विशेष समिती याचा अभ्यास करेल. संपूर्ण सीमावर्ती भागात सुरक्षेच्या कारणास्तव इंटरनेट सेवा सुरू केली जाऊ शकत नाही. या उत्तरावर सर्वोच्च न्यायालयाने समाधान व्यक्त केले. न्या. एन.व्ही.रमण्णा, न्या. सुभाष रेड्डी आणि न्या. बी.आर.गवई यांच्या खंडपीठाने याचे कौतूक केले.
 
 
 
केंद्र आणि जम्मू काश्मिर प्रशासनाच्या या अभ्यासाला चांगली सुरुवात असल्याचे म्हटले आहे. भविष्यात याबद्दल प्रगती होईल, सेवा विस्तार केला जाऊ शकतो, अशी आशा न्यायालयाने व्यक्त केली आहे. ५ ऑगस्ट २०१९ रोजी कलम ३७० हटवल्यानंतर हायस्पीड इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. सुरक्षेच्या कारणास्तव हे पाऊल उचलण्यात आले होते.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0