लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘चला हवा येऊ द्या’चे ‘महिला विशेष’ पर्व!

10 Aug 2020 19:16:40
Zee marathi_1  





मुंबई : ‘कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे’, असे म्हणत गेली पाच वर्षे झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आत्ता पर्यंतच्या प्रवासात ‘चला हवा येऊ द्या’मध्ये प्रेक्षकांनी महाराष्ट्र दौरा, भारत दौरा आणि विश्व दौरा यांचा मनमुराद आनंद लुटला. या कार्यक्रमात नावीन्य म्हणून चला हवा येऊ द्या चे ‘होउ दे व्हायरल’ पर्व प्रेक्षकांच्या भेटीस आले. या पर्वात तुमच्या आमच्या सारख्या लोकांनी प्रेक्षकांना हसवण्याचा विडा उचलला. आणि या यशस्वी पर्वानंतर 'चला हवा येऊ द्या’चे विशेष सिलेब्रिटी पर्व प्रेक्षकांच्या भेटीस आले.


आता 'लेडीज जिंदाबाद' म्हणत चला हवा येऊ द्याचे नविन पर्व सुरु होत आहे. थुकरटवाडीमध्ये सत्ता गाजवणाऱ्या विनोदवीरांना, महाराष्ट्र आणि जगभरातील प्रेक्षकांना या महिला विनोदाचा ‘दे धक्का’ देणार हे नक्की! महिला एकत्र आल्या की चर्चा तर होणारच, आणि सोबत गॉसिप पण रंगणार!


झी मराठीवरील गाजलेल्या मालिकांमधील अभिनेत्री यात स्पर्धक म्हणून असणार आहेत. तुला पाहते रे मधील ईशा (गायत्री दातार), स्वराज्य रक्षक संभाजी मधील सोयरा मातोश्री (स्नेहलता वसईकर), लागीर झालं जी मधील शीतली (शिवानी बावकर), अग्गबाई सासूबाई मधील प्रज्ञा आणि मॅडी (संजीवनी साठे आणि भक्ती रत्नपारखी) सोबत सुरुची अडारकर, मयुरी वाघ, पूर्वा शिंदे, सरिता मेहेंदळे असणार आहेत.
Powered By Sangraha 9.0