ब्रेकिंग ! राज्यसभा खासदार अमरसिंह यांचे निधन

    दिनांक  01-Aug-2020 17:40:56
|

Amar Singh_1  H
 
नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे माजी नेते आणि राज्यसभा खासदार अमर सिंह यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर सिंगापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. २०१३ मध्ये त्यांचे मूत्रपिंड निकामी झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. सिंगापूरच्या एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. येथे उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
 
 
 
२०१६ मध्ये अमर सिंह हे उत्तर प्रदेशातून राज्यसभेचे खासदार म्हणून निवडले गेले होते. समाजवादी पक्षापासून फारकत घेतल्यानंतर ते राजकारणात काहीसे कमी सक्रिय होते. गेल्या सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ ते आजारी होते. १९९६ मध्ये राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडले गेल्यापासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरु झाली होती. विशेष म्हणजे याआधी मार्चमध्ये त्यांच्या म्र्युतूची बातमी ही वाऱ्यासारखी पसरली होती. त्यावर त्यांनी 'टायगर अभी जिंदा है' असा व्हिडिओ मॅसेज सोशल मीडियावरून आपल्या हितचिंतकांना दिला होता.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.