नागपूरजवळील कारखान्यात स्फोट ; ५ ठार

01 Aug 2020 19:12:23

Nagpur_1  H x W
 
नागपूर : नागपूरमधील उमरेड तालुक्यातील बेला गावामध्ये असलेल्या मानस अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेडमध्ये स्फोट झाला. वेल्डिंगचे काम सुरू असताना झालेल्या या स्फोटात ५ कामगारांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार दुपारी ४ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. विशेष म्हणजे, या अपघातात मृत पावलेले सर्वजन हे वडगाव गावातील रहिवासी असल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
 
 
 
पोलिसांनी सांगितल्यानुसार, कंपनीच्या युनिट क्रमांक एकमध्ये असलेल्या मोलासिस टँकमध्ये वायू तयार झाला होता. त्याचवेळी त्या ठिकाणी वेल्डिंगचे काम सुरू असताना अचानक स्फोट झाला. या घटनेत लिलाधर शेंडे, सचिन वाघमारे, मंगेश नौकरकर, वासुदेव लडी आणि प्रफुल मुन या पाच कामगारांचा मृत्यू झाला, तर काही कामगार जखमी झाल्याची शक्यता आहे. या घटनेनंतर लगेचच बेला पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
Powered By Sangraha 9.0