'ईदच्या संदेशासह समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू या'

01 Aug 2020 12:51:43

cm_1  H x W: 0



मुंबई :
देशभरात आज बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मुस्लिम बांधवाना बकरी ईदच्या शुभेच्छा दिली आहेत. 'त्याग आणि समर्पणाची शिकवण देणाऱ्या बकरी ईदच्या संदेशाचा वसा घेऊन समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू या', अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या.



दरम्यान, मुस्लिम मान्यतेनुसार हा सण हजरत इब्राहिम यांच्या कुर्बाणीसाठी साजरा करण्यात येतो. आज या पवित्र प्रसंगी काश्‍मीरपासून कन्याकुमारीपर्यंत ईदचा उत्साह दिसून येत आहे. यावर्षी कोरोना विषाणूच्या उद्भवलेल्या परिस्थितीमुळे बकरी ईद साध्या पद्धतीने साजरी करावी. नागरिकांनी नमाज मस्जिद किंवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता आपल्या घऱीच करावी. सद्यस्थितीत जनावरांचे बाजार बंद आहेत. त्यामुळे जनावरांची खरेदी ऑनलाइन करावी. नागरिकांनी शक्‍यतो प्रतीकात्मक कुर्बानी करावी. प्रतिबंधित क्षेत्रात सध्या लागू असलेले निर्बंध कायम ठेवण्यात येणार आहे. त्यामध्ये बकरी ईदनिमित्त नियमांमध्ये कोणतीही शिथिलता देता येणार नाही. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करता नागरिकांनी बकरी ईद सण साजरा करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
 
Powered By Sangraha 9.0