सुशांत प्रकरणात ईडीने सखोल चौकशी करावी : देवेंद्र फडणवीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Aug-2020
Total Views |

Devendra_1  H x



ईडीने सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी; देवेंद्र फडणवीसांची मागणी


मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात यावे अशी मागणी जोर धरु लागली आहे. मात्र तरीही राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिस यासाठी सक्षम असल्याचे म्हणत, त्यांनी सीबीआय चौकशीस नकार दिला आहे. आता या प्रकरणात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही सखोल चौकशीची मागणी केली आहे.


या प्रकरणाची चौकशी सीबीआयने करावी असे जनमत आहे. मात्र राज्य सरकारची अनुत्सुकता पाहता किमान ईडीने या प्रकरणी ईसाआयआर दाखल करावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीसांकडून करण्यात आली आहे. पुढे फडणवीस म्हणाले की, या प्रकरणात गैरव्यवहार आणि मनी लाँड्रिंग असल्याचे आढळून आले आहे. याच कारणामुळे ईडीने चौकशी करावी. असे ट्विट फडणवीसांनी केले आहे.







यापूर्वी अनेकांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात यावे अशी मागणी केली होती. भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनीही गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी लावू धरली आहे. सुशांतने आत्महत्या केली नसून त्याचा खून झाल्याचा आरोप देखील त्यांनी केला होता. यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे प्रकरण हाताळण्यात मुंबई पोलिस सक्षम असल्याचे म्हटले होते.


सुशांतच्या वडिलांनी पाटण्यात तक्रार केल्याने बिहार पोलिसांची तुकडी महाराष्ट्रात येऊन यासंदर्भात तपास करत आहे. या तपासात अस्नेक महत्त्वाचे मुद्दे समोर येत असून, सुशांतने आत्महत्या केली यावरील प्रश्नचिन्ह गडद होत आहे.









@@AUTHORINFO_V1@@