सुशांतचा पोस्टमॉर्टम अहवाल देण्यास कुपर रुग्णालयाकडून टाळाटाळ!

    दिनांक  01-Aug-2020 14:29:48
|
sushant_1  H x


रिया चक्रवर्तीही गायब; वेगाने फिरतायत बिहार पोलिसांची तपास चक्रे!


मुंबई : सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी बिहार पोलिस मुंबईत आले आहेत. बिहार पोलिसांच्या पथकाने मुंबईतील कूपर रुग्णालयाला भेट दिली. बिहार पोलिसांनी रुग्णालयातून सुशांतसिंग राजपूत यांचा पोस्टमॉर्टम अहवाल मागविला, परंतु अद्याप त्यासंदर्भात माहिती मिळाली नाही. पोस्टमॉर्टम अहवाल देण्यास रुग्णालय टाळाटाळ करत असल्याचा दावा बिहार पोलिसांच्या सूत्रांनी केला आहे. तास दुसरीकडे, रिया चक्रवर्ती तिच्या घरातून गायब झाली आहे. बिहार पोलिस रियाविरूद्ध लुकआउट आदेश देऊ शकतात. बिहार पोलिसांनी रियाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.


रियाचा लॅपटॉप आणि मोबाइल बंद येत आहे. सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणात बिहार पोलिस दररोज नवीन खुलासे करीत आहेत. यामुळे मुंबई पोलिस आणि बिहार पोलिसात वाद सुरू झाले आहेत. रियाचे मुंबईतील उच्चपदस्थ अधिकारी आणि महाराष्ट्रातील प्रख्यात नेत्याशी चांगले संबंध आहेत, यामुळे तिचा बचाव होत असल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणात बिहार पोलिसांनी रियाविरूद्ध पुरावे गोळा करण्यास सुरवात केली आहे.


बिहार पोलिसांकडे रिया चक्रवर्तीविरूद्ध काही मोठे पुरावे असून, अशा परिस्थितीत तिची तातडीची चौकशी करणे आवश्यक असल्याने तिचा शोध घेतला जात आहे. रिया शुक्रवारपासून घरातून गायब असुन, फोनही बंद येत असल्याने तिच्या भोवती संशयाचा घेरा वाढत आहे. बिहास पोलिस सध्या रियाचा कसून शोध घेत आहेत.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.