घर खरेदीसाठी यापेक्षा जास्त चांगली संधी भविष्यातही नाही !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jul-2020
Total Views |
Home _1  H x W:



मुंबई : कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात आपण घर खरेदीची योजना आखत आहात तर हीच संधी योग्य आहे. लॉकडाऊन आणि मान्सूनची वेळच बजेटमधील घर खरेदी करण्यासाठी उत्तम असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. भविष्यात यापेक्षा अन्य कोणतिही योग्य वेळ असूच शकत नाही. देशात २०२० पूर्वीच सहा महिन्यांत घर खरेदी करण्याच्या प्रक्रीयेत ४९ टक्क्यांपर्यंत मंदी आली आहे. अर्थात विकासकांनी घरांच्या किंमतीही कमी केल्या आहेत. पावसाळ्यात अशीही दरवर्षी या क्षेत्राला सुस्ती येते. 


पावसाळ्यात अनेक विकासकांच्या कंपन्या साईट विझिट देणे नाकारतात. कारण घरे उत्तम व राहण्यायोग्य असली तरी आजूबाजूंच्या रस्त्यांवर साचणारे पाणी, वाहतूकीची व्यवस्था या सगळ्यांचा ग्राहकांवर परिणाम होऊ नये म्हणून या काळात तशी विक्री कमीच असते. मात्र, याच काळात ग्राहकांना घर आणि प्रॉपर्टी योग्य प्रकारे पारखून घेता येते. तुम्ही येत्या काळात फ्लॅट विकत घेण्याची तयारी करत असाल तर लॉकडाऊनमुळे भरघोस सवलत तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. अनेक गृहविक्री कंपन्यांनी त्यांच्या ग्राहकांसाठी विविध ऑफर्सही लागू केल्या आहेत. 


घर खरेदी पावसाळ्यातच का ?

घर खरेदी करत असताना आजूबाजूच्या बांधकाम व सुखसोयींचा विचार केला जातो. पावसात काही रस्त्यांवर पाणी भरण्याच्या समस्या असतात. ज्यावेळी ग्राहक साईट व्हीझिटवर जाल त्यावेळी या गोष्टीही पडताळून घेतात. तसेच वाहतूक व्यवस्था, ट्राफिक वीज-पाणी या गोष्टींवरही बारकाईने लक्ष देता येते. या गोष्टी पावसाळ्यातच पाहायला मिळू शकतात. इतर दिवसा याचा अंदाज येऊ शकत नाही. 

वीजेचा प्रश्न


काही भागांत पावसाळ्यात वीजपुरवठा खंडीत होण्याची शक्यता जास्त असते. काही शहरांमध्येही अशा प्रकारे तासंतास वीज गायब असते. तुम्ही अशाच एखाद्या क्षेत्रात घर खरेदी करत असाल तर तुम्हाला विकसकाकडून पार्कींग व लिफ्टसाठी जनरेटरची सोय आहे की नाही याबद्दल पडताळणी करता येईल.

बनावटीपासून बचाव


इमारत भलेही बाहेरून सुंदर दिसेल परंतू अनेकदा आतील बांधकाम मजबूत आहे की नाही याबद्दल पावसाळ्यातच अंदाज येऊ शकतो. पावसाळ्यात इमारतीतील नव्या बांधकामात असलेली गळती, छतातून किवा आवारात होणाऱ्या गळतीकडेही लक्ष द्यायला हवे. विशेषतः बाथरुममध्ये अशा प्रकारे गळती जाणवत असेल तर अशी घरे न खरेदी करणेच योग्य राहिल. आवारात पाणी साचते की नाही याचीही पडताळणी तुम्ही पावसाळ्यातच करू शकता.


कोरोनामुळे प्रॉपर्टी क्षेत्रावर प्रभाव


नुकताच प्रॉपर्टी कंसल्टेंट एनरॉक यांच्यातर्फे देण्यात आलेल्या अहवालानुसार २०१९ च्या तुलनेत २०२०मध्ये पहिल्या सहा महिन्यात प्रॉपर्टी क्षेत्रात ४९ टक्के घसरण नोंदवण्यात येत आहे. याशिवाय अन्य अहवालानुसार विविध क्षेत्रातील प्रॉपर्टी बाजारात १० ते २० टक्क्यांपर्यंत किंमती घसरल्या आहेत. तसेच ग्राहकांना विकसकांतर्फे खरेदीसाठी सवलतही दिली जात आहे.



@@AUTHORINFO_V1@@