देशहितासाठी 'या' अभिनेत्याने तोडले चायनीज ब्रँडसोबतचे कनेक्शन

09 Jul 2020 18:09:36

kartik aryan_1  



मुंबई :
बॉलिवूड सेलिब्रेटी कार्तिक आर्यनने कमी वेळात आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांचे मन जिंकले. कार्तिक आर्यन 'ओप्पो' या चायनीज मोबाईल कंपनीचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. मात्र नुकत्याच त्याने आपल्या सोशलमिडीयावरून शेअर केलेल्या फोटोतून कार्तिकने ओप्पोशी असणारे व्यवहार संपवले असल्याचे संकेत दिले आहे. याबाबत त्याने कोणताही अधिकृत दुजोरा दिला नाही. ट्रेडच्या तज्ज्ञांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे तसेच चायनीज ब्रँडशी व्यवहार संपविणारा कार्तिक बॉलिवूडमधील पहिला सेलिब्रेटी बनला आहे. कार्तिकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटरवर एका फोटो शेअर केला आहे. या फोटोत कार्तिकच्या हातात आयफोन दिसतो आहे. खिडकीत बसून तो आकाशाचे फोटो काढतो आहे. यानंतर मीडियासह त्याच्या चाहत्यांनीही कार्तिकने चायनीज मोबाईल ब्रँडची जाहिरात बंद केल्याचा अंदाज वर्तविला आहे.


अंदाज वर्तविण्यामागील कारण


वास्तविक जेव्हा सेलिब्रेटी म्हणून एखाद्या ब्रँडचे अॅम्बेसेडर असाल तर आपण या व्यवसाय कराराअंतर्गत सोशल मीडियावर इतर कोणत्याही ब्रँडची जाहिरात करू शकत नाही. जर कोणी असे केले तर त्या व्यक्तीला कायदेशीर मार्गाने अडचणी येऊ शकतो.





व्यवसाय तज्ञ काय म्हणतात?

दै.भास्करने याबाबत व्यापार तज्ज्ञांशी बोलतांना त्यांनी पुष्टी केली की, कार्तिक ओप्पोमधून बाहेर पडला आहे. भारत आणि चीनमधील सध्याच्या तणावामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असावा. हे पाऊल उचलणारा कार्तिक पहिला बॉलिवूड सेलिब्रिटी ठरला आहे. असा विश्वास आहे की कार्तिकमुळे प्रेरित होऊन तो उर्वरित सेलेब्रिटींच्या हितासाठी हे पाऊल उचलू शकेल.


१८ जून रोजी सीएआयटीने चीनी ब्रँड सोडण्याचे आवाहन केले

१५ जून रोजी गलवान खोऱ्यात चिनी सैन्याने केलेल्या हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाले. या घटनेच्या तीन दिवसांनंतर म्हणजेच १८जून रोजी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेड्सने एक पत्र लिहून सेलिब्रिटींना चिनी ब्रॅण्ड्सचे एंडोर्समेंट सोडण्याचे आवाहन केले.


कोणकोणत्या सेलिब्रिटींचे यात नाव ?

आमिर खान, सारा अली खान, विराट कोहली - vivo
दीपिका पादुकोण, कटरीना कैफ, बादशाह, सिद्धार्थ मल्होत्रा, रणबीर कपूर- oppo

रणवीर सिंह - Xiaomi
सलमान खान, आयुष्मान खुराना, श्रद्धा कपूर- Realme
Powered By Sangraha 9.0