भारतीय सैन्याला मोबाइलमधून ८९ अ‍ॅप्स हद्दपार करण्याचे आदेश!

09 Jul 2020 09:37:49
Army_1  H x W:


देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने भारतीय लष्कराचा मोठा निर्णय


नवी दिल्ली : भारतीय सैन्याने आपल्या सैनिकांना स्मार्टफोनमधून ८९ अॅप्स हटविण्याच्या सूचना दिल्या आहेत. लष्करातून बाहेर पडणारी माहिती रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या अ‍ॅप्समध्ये टिकटॉक, ट्रू कॉलर आणि इंस्टाग्राम इत्यादींचा समावेश आहे. नुकतेच या संदर्भात जाहीर करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये, सैनिकांना टिंडर, बम्बलसारखे डेटिंग अॅप्स आणि डेलीहंटसारखे न्यूज अ‍ॅप्स डिलीट करण्यास सांगितले आहे. डेटा सिक्युरिटीच्या मुद्द्यावरून भारत सरकारने चीनच्या ५९ अॅप्सवर आधीच बंदी घातली आहे.


लष्कराच्या आदेशानुसार प्रत्येकाला १५ जुलैपर्यंत हे अॅप्स मोबाईलमधून काढून टाकावे लागणार आहेत. सैन्याच्या संवेदनशील माहितीच्या लीक होण्याचा हवाला देत, हा निर्णय घेण्यात आला आहे. लष्कराने म्हटले आहे की, ज्यांच्या कोणाच्या मोबाईलमध्ये फेसबुक, इंस्टाग्राम व्यतिरिक्त हे इतर ८९ अॅप्स आढळतील. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. गेल्या नोव्हेंबरमध्ये सैन्याने आपल्या कर्मचार्‍यांना अधिकृत कामासाठी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करू नये अशी सूचना केली होती. तसेच महत्त्वाच्या पदांवर उपस्थित लष्कराच्या अधिकाऱ्यांना फेसबुक अकाउंट डिलीट करण्यास सांगितले होते.
Powered By Sangraha 9.0