"मी गॅंगस्टार विकास दुबे आहे!" अटकेपूर्वी देत होता घोषणा

09 Jul 2020 11:33:32
Vikas Dube_1  H



उज्जैन : कानपूर बिकरू शुटआऊटचा प्रमुख आरोपी विकास दुबेला गुरुवारी सकाळी उजैनहून ताब्यात घेण्यात आले आहे. महाकाल मंदिरात दर्शनासाठी गेल्यावर त्याला ताब्यात घेण्यात आले. उत्तर प्रदेश पोलीसांच्या पथकाने सहा दिवसांपासून त्याचा शोध सुरू केला होता.

महाकाल मंदिरात सुरक्षा रक्षकांनी त्याला संशयित म्हणून पकडले होते. महाकाल पोलीस ठाण्यात सूचना केल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. महाकाल मंदिरात गेल्यानंतर मी विकास दुबे आहे, असे तो मोठ्याने ओरडत होता. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला अटक केली. मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले, "विकास दुबे मध्यप्रदेश पोलीसांच्या पोलीस कोठडीत आहे. त्याला अटक करण्यात आली अटक कशी झाली याबद्दल आताच काही सांगणे शक्य नाही."

विकास दुबेने स्वतः अटक करवून घेत पोलीसांकडे शरण घेतली असल्याचे बोलले जात आहे. इतर गुन्हेगारांप्रमाणे आपलाही एन्काऊंटर होईल की काय, अशीही भीती त्याला होती. त्यामुळे स्वतःच स्वतःची ओळख सांगून तो पोलीसांत अटक झाल्याचेही बोलले जात आहे. 

कानपूरच्या चौबेपूर पोलीस ठाणे विभागात त्याच्या मागावर असणाऱ्या पोलीसांवर फायरींग झाली. त्यात आठ पोलीस शहिद झाले. त्यानंतर फरार असलेल्या विकास दुबेच्या मागावर उत्तर प्रदेश पोलीस होते. सर्व जागांवर त्याचा शोध सुरू केला होता. या शोधात त्याच्या काही साथीदारांचा खात्मा करण्यात आला होता. आपलाही अंत असाच होऊ शकतो, असे जाणून त्याने ही शरणागती पत्करली असल्याचेही बोलले जात आहे.



Powered By Sangraha 9.0