संविधान विषय ५० गुणांसाठी अनिवार्य करा !

09 Jul 2020 14:13:02
Indian Constitution _1&nb




मुंबई : भारतीय संविधानाचे महत्व विद्यार्थ्यांना समजावे, तसेच सुजाण नागरिक म्हणून संविधानातील हक्क व कर्तव्याची जाण पुढील पीढीला व्हावी यासाठी हा विषय बारावीच्या वर्गासाठी अनिवार्य करावा, अशी मागणी राज्यातील साहित्यिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान या तीनही शाखांना हा विषय अनिवार्य करावा, असे या पत्रात म्हटले आहे. 

गणेश देवी, रावसाहेब कसबे, महेश केळुसकर आणि इतर साहित्यिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. पत्रातील मागणीत उल्लेख केल्यानुसार, राज्यातील विद्यार्थ्यांना नववीपासूनच संविधान विषयाची प्रार्थमिक माहिती देण्यात यावी मात्र, बारावीच्या वर्षात ५० गुणांचा विषयाची प्रश्नपत्रिका यासाठी ठेवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या मागणीचा गांभीर्याने विचार करण्यात यावा, अशी विनंतीही या पत्रात करण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0