सुशांत आणि रियाच्या नात्यात महेश भट्टना इतका रस का?

    दिनांक  09-Jul-2020 15:40:06
|

Mahesh_1  H x Wघराणेशाही वादावर बोल लावणाऱ्या पूजा भट्टला कंगनाचा सवाल!


मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमधला ‘घराणेशाही’ वाद चांगलाच चव्हाट्यावर आला. या वादात आता पूजा भट्टने उडी घेतली आहे. घराणेशाहीवर टीका करणाऱ्या कंगनाने महेश भट्ट यांच्या चित्रपटाद्वारेच पदार्पण केले होत,’ अशा आशयाचे ट्विट करत पूजाने आता नवा वाद सुरु केला आहे. यावर कंगनानेही तिला सडेतोड उत्तर देत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

पूजाच्या या ट्विटनंतर त्याला उत्तरादाखल कंगनाच्या टीमकडूनही उत्तर देण्यात आले. ‘प्रिय पूजा भट्ट, अनुराग बसूंनी कंगनाचे कलागुण हेरले होते. महेश भट्ट कलाकारांना पैसे देणे टाळतात. त्यांना प्रतिभाशाली कलाकारांकडून उपकारांच्या नावाखाली फुकट काम करून हवे असते. अनेक स्टुडीओ असे करतात. म्हणून तुझ्या वडिलांना त्यांच्यावर चप्पल उगारण्याचा किंवा त्यांना पागल म्हणण्याचा अधिकार मिळत नाही.’ असे ट्विट कंगनाने केले.

तर, त्यांनीच कंगनाच्या वाईट अंताची घोषणा केली होती. याशिवाय सुशांत आणि रियाच्या नात्यात त्यांना इतका रस का होता? का त्यांनी सुशांतच्या शेवटाची घोषणा केली होती?, आसे आणखी प्रश्न आहेत जे तू त्यांना विचारले पाहिजेस, असे खडे बोल कंगनाच्या टीमने उत्तरादाखल पुजला सुनावले आहेत.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.