बोरिवली नॅशनल पार्कमधील 'आनंद' वाघाचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jul-2020
Total Views |

tiger_1  H x W:


कर्करोगजन्य दीर्घकालीन आजाराने 'आनंद' ग्रस्त होता

 
 
मुंबई (विषेश प्रतिनिधी) - बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'च्या व्याघ्र सफारीमधील 'आनंद' नामक नर वाघाचा आज पहाटे मृत्यू झाला. गेल्या महिन्याभरापासून 'आनंद' हा ओठावर आलेल्या कर्करोगजन्य गाठीने ग्रस्त होता. त्याला वाचविण्यासाठी पशुवैद्यकांनी केलेल्या अथक प्रयत्नानंतरही आज पहाटे त्याच्या मृत्यू झाला.
 
 

tiger_1  H x W: 
 
 
नॅशनल पार्कच्या व्याघ्र सफारीचे आकर्षण असणाऱ्या 'आनंद' वाघाच्या खालच्या ओठावर गाठ निर्माण झाली होती. काही दिवसांपू्र्वी मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या तज्ज्ञ पथकाने त्याची तपासणी करून बायोप्सी केली होती. या तपासणीत त्याला कर्करोगजन्य अतिशय घातक अशी गाठ आल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर आठवड्याभरापासून त्याने अन्नग्रहणही बंद केले होते. त्यामुळे आनंदला आयव्ही फ्लूइड्स आणि सप्लिमेन्टस् देण्यात येते होते. अखेरीस आज पहाटे त्याने जीव सोडला.  त्याचे वय दहा वर्षांचे होते. गेल्या वर्षी मे महिन्यात अशाच प्रकारच्या आजाराने त्याचा भाऊ 'यश' नामक वाघाचा मृत्यू झाला होता. आता नॅशनल पार्कच्या व्याघ्र सफारीमध्ये नागपूरहून आणलेल्या 'सुलतान' नामक एकच नर वाघाचे अस्तित्व राहिले आहे. तर, इतर चार वाघिणी आहेत.
@@AUTHORINFO_V1@@