सीबीएसबी बोर्डाच्या निकालाची तारीख जाहीर झाली नाही ! व्हायरल पत्र खोटे

    दिनांक  09-Jul-2020 16:40:08
|
CBSE_1  H x W:
 
नवी दिल्ली
: सीबीएसई बोर्डाने गुरुवारी परिपत्रक जारी करत परीक्षांच्या निकालाच्या तारखा जाहीर केल्या, अशी घोषणा एएनआय या वृत्तसंस्थेने दिली होती. बारावीचा निकाल ११ जुलै रोजी तर दहावी बोर्डाचा निकाल १३ जुलै रोजी लागणार आहे, असे या पत्रकात म्हटले होते. परंतू वृत्तसंस्थेने दाखला देऊन प्रसिद्ध केलेले पत्रक हे अधिकृत नसल्याचा खुलासा सीबीएससीतर्फे करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन बोर्डाने केले आहे. 

 
CBSE_1  H x W:
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.