सचिनने दिल्या दादाला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा !

    दिनांक  08-Jul-2020 17:03:41
|

sachin sourav_1 &nbs
मुंबई : भारतीय क्रिकेटला आंतरराष्ट्रीय स्तरावर तगडी ओळख निर्माण करून देण्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा महत्त्वाचा वाटा होता. याच सौरव गांगुलीचा म्हणजे बंगाल टायगर दादाचा आज वाढदिवस. यानिमित्त विश्वभरातून त्याला शुभेच्छा देण्यात आल्या. त्याचा सलामीवीर जोडीदार सचिन तेंडूलकरने देखील त्याला हटके शुभेच्छा दिल्या आहेत.
 
 
 
सचिनने ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, दादी. आपल्या मैदानावरील भागीदारी प्रमाणेच मैदानाबाहेरची भागीदारी देखील अशीच रहावी.” अशी इच्छा व्यक्त करत त्याने अभिवादन केले. २०००मध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आक्रमक खेळी करत परदेशात देखील विजय प्राप्त करण्यास सुरवात केली. त्यामुळे परदेशात सोडून फक्त घरच्याच मैदानात शेर असल्याचा ठपका भारतीय संघाला पुसता आला. तसेच २००२ मधील चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे संयुक्त विजेतेपद आणि २००३ मधील आयसीसीच्या एकदिवसीय विश्वचषकात उपविजेतेपद राखत भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात दबदबा निर्माण केला. त्यामुळे भारतीय संघाला आकार देण्याचे महत्वाचे काम दादाने केले आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.