चीनला दणका ! ऑनलाईन वस्तू विक्रीवर 'कंट्री ऑफ ओरीजन' सक्ती

08 Jul 2020 18:32:37
Country of origin _1 


नवी दिल्ली : चीनी अॅप्सवर बंदी आणल्यानंतर भारत आता आणखी एक दणका देण्याच्या तयारीत आहे. चीनी वस्तूंविरोधात बहिष्काराची मोहिम तीव्र होत असताना आता ऑनलाईन विक्री केल्या जाणाऱ्या चीनी वस्तूही लक्ष्य करण्यात येणार आहेत. मात्र, हे सर्व करत असताना भारत योग्य रणनिती आखत चीनी वस्तूंना लक्ष्य करण्याची तयारी करत आहे. ऑनलाईन ई-कॉमर्स क्षेत्रातील वस्तूंची विक्री करत असताना उत्पादन घेणाऱ्या देशाची माहिती सोबत देणे अनिवार्य केले जाणार आहे.
याबद्दल प्रार्थमिक स्वरुपात बैठका सुरू असून ऑनलाईन बाजारपेठ कंपन्यांना या बदलासाठी अंतिम मुदत दिली जाणार आहे. १ ऑगस्टपासून ही नियमावली लागू केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ऑनलाईन कंपन्यांनी मात्र, या प्रकारचा बदल हा सहज शक्य नसल्याचे म्हटले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी सतत संवाद सुरू आहे. यापूर्वी केंद्र सरकारने ऑनलाईन वस्तू विक्री करणारी सरकारी वेबसाईट 'जीईएम'वर असा नियम लागू केला होता.
Powered By Sangraha 9.0