विस्तारवादी रावणाचा अंत करणाऱ्या प्रभू रामचंद्रांचा अमुचा देश

    दिनांक  08-Jul-2020 17:58:21
|

UT Minister and Xi JingPi


नवी दिल्ली : उत्तराखंडचे पर्यटनमंत्री सतपाल महाराज यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिंगपिंग यांना रामायणाची प्रत पाठवली आहे. आपल्या विस्तारवादी रणनितीचा मार्ग सोडावा, असा संदेश त्यांनी या द्वारे दिला आहे. विस्तारवादी रावणाच्या अहंकाराचा अंत करणारा आमचा देश आहे, असा इशारा त्यांनी चीनला दिला आहे. सतपाल महाराज यांनी कमला सुब्रमणियम यांची इंग्रजीतील प्रत शि जिंगपिंग यांना पाठवली आहे. 


उत्तराखंड सरकारच्या मंत्री सतपाल महाराजांनी गलवान खोऱ्यात झालेल्या भारतीय सैनिकांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. ज्या प्रकारे निशस्त्र जवानांवर चीनी सैन्याने हल्ला केला हा प्रकार निंदनीय आहे. सतपाल महाराजांच्या मते, रावणाला झालेल्या अहंकाराचा प्रभू श्रीरामचंद्रांनी जसा मिटवला होता ही आठवण करून देण्यासाठी ही प्रत पाठवली आहे. याच विचाराने रावणाने स्वतःचा सर्वनाश ओढावून घेतला होता. 


जर ही प्रत शी जिंगपिंग यांनी खरोखर वाचली तर नक्कीच त्यांचे डोळे उघडतील, असा विश्वात त्यांना आहे. ते म्हणतात, "जिथे जग कोरोना विरोधात लढण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे, तिथे चीन सारखा विस्तारवादी देश आपल्या सैन्याची सज्जता वाढवण्यात व्यस्त आहे. भारत हा कधीच विस्तारवादी नव्हता. भारताने बांग्लादेश जिंकल्यावर अधिकार असतानाही एक स्वतंत्र देश म्हणून घोषित केले. याऊलट चीन हा पूर्वीपासूनच विस्तारवादी भूमिकेत कायम राहिला आहे. तिबेटचा उल्लेख करत ते म्हणाले, हाच विस्तारवाद त्यांनी तिबेट ताब्यात घेतानाही काय ठेवला आहे. 


भारत सरकारने चीनी वस्तूंवर बंदी घातल्यानंतर उत्तराखंड पर्यटन मंत्री सतपाल यांनी चीनी कंपन्यांविरोधात थेट कारवाई करण्याची मोहिम राज्यात उघडली होती. त्यांच्या सचिवांना याबद्दलची सविस्तर माहिती गोळा करण्यास सांगितले होते. चीनला राजकीय डावपेच, रणनिती, कूटनिती आणि आर्थिक पातळीवर घेरण्याची योजना त्यांनी आखली आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.