शैक्षणिक अधिष्ठान की, सरकारचा वैयक्तिक अहंकार?

08 Jul 2020 19:39:31

ashish shelar_1 &nbs
मुंबई : सध्या महाराष्ट्रामध्ये हळूहळू जनजीवन पुन्हा सुस्थितीमध्ये आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. कोरोनाचे काळे ढग डोक्यावर असताना अंतिम परीक्षांबाबत मोठा गोंधळ सुरु आहे. याबाबत भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट करून राज्य सरकारला पुन्हा एकदा धारेवर धरले आहे. “शैक्षणिक अधिष्ठान की, सरकारचा वैयक्तिक अहंकार?” असा सवाल त्यांनी विचारला आहे.
 
 
आशिष शेलार यांनी ट्विट केले आहे की, “अंतिम वर्षे परिक्षांबाबत युजीसीच्या गाईडलाईन आल्यानंतर ना सिनेटमध्ये त्याची चर्चा झाली नाही, ना राज्य सरकारने कुलगुरूंची मते जाणून घेतली. शिक्षण तज्ञांशी सल्लामसलत केली नाही राज्यापालाशीही त्यांनी चर्चा केली नाही. थेट युजीसीला पत्र लिहून हात वर करुन सरकार मोकळे झाले...” अशी टीका त्यांनी केली.
 
 
“त्यामुळे "शैक्षणिक अधिष्ठान" आहे की, सरकारचा वैयक्तिक "अहंकार?” असा सवाल त्यांनी विचारला आहे. “हाच अहंकार महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे देशपातळीवर नुकसान करणारा ठरु नये. महाराष्ट्राचे विद्यार्थी देशपातळीवर मागे पडू नयेत.” अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.
Powered By Sangraha 9.0