फरार नीरव मोदीला ईडीचा दणका ; ३२६ कोटींची संपत्ती जप्त

08 Jul 2020 18:26:31

nirav modi_1  H



मुंबई
: फरार हिरा व्यापारी आणि पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदी यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. संचालक मंडळाने दिलेल्या माहितीनुसार,नीरव मोदीची ३२६.९९कोटी रुपयांची संपत्ती आर्थिक गुन्हे कायद्यांतर्गत जप्त केली गेली आहे.



ईडीने दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या संपत्तीत मुंबईतील वरळी येथील समुद्र महाल इमारतीतील चार फ्लॅट्स, अलिबागजवळील जमीन व समुद्रजवळील एक फार्महाऊस, जैसलमेर येथील एक पवनचक्की, लंडनमधील फ्लॅट, संयुक्त अरब अमिराती (यूएई) मधील निवासी फ्लॅट यांचा समावेश आहे. तसेच काही समभाग आणि बँक ठेवी जप्त करण्यात आल्या आहेत.



भारतातील कोट्यवधी रुपयांच्या बँक कर्ज घोटाळा आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील आरोपी नीरव मोदी मागील वर्षांपासून लंडनमध्ये तुरुंगात कैद आहे. गेल्या महिन्यात लंडनमधील वेस्टमिन्स्टर कोर्टाने नीरव मोदीला ९ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. अटकेनंतरपासून तो वॅन्ड्सवर्थ कारागृहात आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) जवळपास दोन अब्ज डॉलर्सच्या घोटाळ्याप्रकरणी नीरव मोदीला ब्रिटनमध्ये प्रत्यर्पणाला सामोरे जावे लागत आहे. त्याच्या प्रत्यार्पणाच्या खटल्याची सुनावणी ७ सप्टेंबरला होणार आहे. तोपर्यंत दर २८ दिवसांनी त्याच प्रकारे सुनावणी केली जाईल.
Powered By Sangraha 9.0