लोक चिडलेत, तुमच्या मुलाखतीत कोणालाही इंटरेस्ट नाही :निलेश राणे

07 Jul 2020 14:59:22

nilesh rane_1  


मुंबई :
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत शिवसेनेचे नेते व सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतली आहे. ही मुलाखत लवकरच वृत्त वाहिन्यांवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच ही मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. मात्र देश कुठल्या संकटात आहे आणि ह्यांच्या मुलाखती चालू आहेत, अशी टीका भाजप भाजप नेत्यांकडून कडून होत आहे.


भाजपाचे नेते निलेश राणे यांनी ट्विट करत शरद पवार आणि संजय राऊतांच्या मुलाखतीवर निशाणा साधला आहे. निलेश राणे म्हणाले की, देश कुठल्या संकटात आहे आणि ह्यांच्या मुलाखती चालू आहेत. इतिहासामध्ये जाऊन काही गोष्टी आत्ता कळल्या तरी त्याचा कोणाला काय उपयोग? लोक चिडली आहेत, इंटरव्यूमध्ये इंटरेस्ट कोणाला नाही. तसेच खरे कौशल्य लढ्यामध्ये असते बोलण्यामध्ये नाही, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.



दरम्यान संजय राऊत यांनी ट्विट केले कि, देशाचे नेते शरद पवार यांच्याशी आज दिलखुलास गप्पा झाल्या. ही जोरदार राजकीय मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल. लवकरच सामनात प्रसिद्ध होइल आणि वृत्त वाहिन्यांवर पहाता येईल. या मुलाखतीत शरद पवार चीनपासून महाराष्ट्रातील घडामोडी पर्यंत जोरदार बोलले. वास्तविक गेल्या दोन दिवसांपासून राज्य सरकारमध्ये कोणताही समन्वय नसल्याचे चित्र आहे. चार दिवसांपूर्वी मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या अचानक रद्द करण्यात आल्या. यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख आणि शिवसेनेत मतभेद निर्माण झाल्याचे चित्र आहे. पारनेरच्या पाच शिवसेना नगरसेवकांनी बारामती गाठत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. या सगळ्या राजकारणावरून ठाकरे सरकार पडणार असल्याच्या चर्चादेखील रंगात आहे. सध्या महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती असताना राज्यातील तिघाडी सरकार मात्र राजकारण करण्यात गुंग असल्याची टीका विरोधीपक्ष भाजपने केली आहे.
Powered By Sangraha 9.0