‘टिकटॉक’चे ऑफिस हॉंगकॉंगमधून हद्दपार!

07 Jul 2020 14:28:57

Tiktok_1  H x W



हाँगकाँगमध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायदा अस्तित्त्वात आल्याने टिकटॉकला बंद करावे लागले ऑफिस!

नवी दिल्ली : भारत सरकारने अलीकडेच भारतात टिकटॉकसह चीननिर्मित ५९ अॅप्सवर बंदी घातली. एक धक्का पचवताना टिकटॉकला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. टिकटॉकचे हॉंगकॉंगमधील ऑफिस आता बंद करण्यात आले आहे. याबाबत बोलताना टिकटॉकच्या प्रवक्त्याने सांगितले की अलीकडील घटनांमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता आम्ही हाँगकाँगमध्ये टिक टॉक अ‍ॅपचे कामकाज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.


हाँगकाँगमध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायदा अस्तित्त्वात आल्यानंतर टिकटॉक या व्हिडिओ मेकिंग अ‍ॅपला आपले ऑफिस बंद करावे लागले आहे. आता कंपनी वॉल्ट डिस्नेचे माजी सह-कार्यकारी केविन मेयर चालवित आहेत. टिकटॅकने यापूर्वी असेही म्हटले आहे की चीन सरकारकडून सेन्सर किंवा टिकटॉकच्या वापरकर्त्याच्या डेटावरील माहितीसंबंधात केलेली कोणतीही विनंती कंपनी स्वीकारणार नाही. हाँगकाँग ही कंपनीसाठी एक छोटी बाजारपेठ आहे, तसेच त्याचा फारसा लाभ मिळत नसल्याने ऑफिस बंद करावे लागत असल्याचे कारण कंपनीने दिले आहे.
Powered By Sangraha 9.0