‘टाटा सन्स’कडून महाराष्ट्राला मदतीचा हात!

07 Jul 2020 09:45:33

Tata_1  H x W:



१०० व्हेंटिलेटर्स आणि १० कोटी रुपयांचा निधी आणि २० रुग्णवाहिका महाराष्ट्राच्या मदतीसाठी!


मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. तर प्रत्येक दिवसाला हजारोंच्या संख्येने नव्याने कोरोनाबाधितांची वाढ होत असल्याचे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाग्रस्तांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्य सरकार कोविड आणि क्वारंटाइन सेंटर्सची उपलब्धता करुन देत आहेत. तसेच सरकार आता ऑक्सिजनची सोय असणाऱ्या बेड्स उपलब्ध करुन देण्याकडे अधिक भर देत आहेत. याच दरम्यान आता टाटा सन्स यांच्याकडून कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्य सराकारला मदतीचा हात पुढे केला आहे.


टाटा सन्स यांनी राज्य सरकारकडे २० रुग्णवाहिका, १०० व्हेंटिलेटर्स आणि १० कोटी रुपयांचा निधी सुपूर्द केला आहे. टाटा सन्स यांनी केलेली मदत राज्य सरकारला मिळाल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्व स्तरातून राज्य सरकारच्या सीएम फंडमध्ये निधी जमा करण्यात आला आहे. हा निधी कोरोनाबाधित रुग्णांसह गरजूंसाठी वापरला जातो. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांवर डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांकडून अहोरात्र उपचार करण्यात येत आहेत. तसेच कोविड वॉरिअर्स सुद्धा कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावताना दिसून येत आहेत.



Powered By Sangraha 9.0