मराठा आरक्षण : १५ जुलैला होणार पुढील सुनावणी!

07 Jul 2020 15:28:35
Maratha reservation_1&nbs


व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे निकाल शक्य नाही, मराठा आरक्षणावरील सुनावणीत सुप्रीम कोर्टाचे मत

नवी दिल्ली : मराठा आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे महत्त्वाची सुनावणी झाली. मात्र सर्वोच्च न्यायालय व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कुठल्याही प्रकारे निकाल देऊ शकत नाही, असे सांगत न्यायालय नियमित सुरु झाल्यावर मराठा आरक्षण सुनावणीवरील निकाल देणार असल्याची भूमिका सर्वोच्च न्यायालयाने मांडली आहे. सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता पुढील सुनावणी १५ जुलै रोजी होणार आहे.


न्यायालयाच्या आजच्या सुनावणीत याचिकाकर्त्यांनी आपल्या बाजू ठोसपणे मांडल्या. मात्र, यानंतर न्यायालयाने दोन्ही बाजू सविस्तर ऐकून घेतल्यानंतरच निर्णय देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मराठा आरक्षणाचे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या मोठ्या खंडपीठाकडे जाणार की नाही, वैद्यकीय पदव्युत्तर परीक्षा अभ्यासक्रमात मराठा आरक्षणाच्या विरोधी याचिकांवर सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेते यावर आजची सुनावणी होती. मागच्या वेळी झालेल्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमात मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार दिला होता. मात्र सोबतच हा अंतरिम निर्णय असून याचे भवितव्य अंतिम निकालावर अवलंबून असेल असेही सांगण्यात आले होते.


राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागास प्रवर्गासाठी (मराठा समाज) शिक्षण व शासकीय सेवेत आरक्षण लागू करण्याकरिता विधिमंडळाने विधेयक संमत केले. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे होते. आता सर्वोच्च न्यायालयात हा कायदा टिकावा, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
Powered By Sangraha 9.0