सुशांतच्या हातून का गेले भन्साळींचे मोठे चित्रपट?

06 Jul 2020 11:52:34

sushant_1  H x



सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी संजय लीला भन्साळींची आज चौकशी!

मुंबई : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची चौकशी आज करण्यात येणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार संजय लीला भंसाली यांची चौकशी 'बाजीराव मस्तानी' आणि 'रामलीला' या चित्रपटासंदर्भात केली जाणार आहे.


पोलिस तपासात मिळालेल्या माहितीनुसार, संजय लीला भन्साळीं हे सुशांत सिंह राजपूतला 'बाजीराव मस्तानी' आणि 'रामलीला' या चित्रपटांसाठी कास्ट करु इच्छित होते. मात्र एका मोठ्या प्रोडक्शन हाऊससोबत झालेल्या कॉन्ट्रॅक्टमुळे सुशांतला हे चित्रपट मिळू शकले नाहीत. त्यामुळे सुशांत आणि प्रोडक्शन हाऊसमध्ये तणाव निर्माण झाला होता. कारण सुशांत हे चित्रपट करु इच्छित होता. मात्र त्या प्रोडक्शन हाऊसने त्याला करार मुक्त केले नाही.


तर, या बड्या प्रोडक्शन हाऊससोबतचे करार तोडल्यानंतर फिल्म इंडस्ट्रीमधील काही मोठ्या लोकांनी सुशांतला एकटे पाडण्याचे सतत प्रयत्न केले. त्यामुळेच सुशांतला काम मिळणे कठिण झाले असल्याचे काहींनी म्हंटले. मात्र सुशांतने आपल्या अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर एम. एस. धोनीसारखा मोठा चित्रपट केला. मात्र त्यानंतरही त्याच्या अडचणी कमी झाल्या नाहीत. सुशांतने आपल्या काही जवळच्या मैत्रिणींना या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम न करण्याबाबत सांगितले होते, त्यामुळे आता या दृष्टीकोनातून तपास केला जाणार आहे.


या प्रकरणी पोलिस संजय लीला भन्साळी यांची चौकशी करणार आहेत. या चौकशी दरम्यान मिळालेली माहितीत किती सत्यता आहे हे पडताळले जाणार आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी पोलिस विभागाकडून कसून चौकशी केली जात आहे. आतापर्यंत या प्रकरणी २८ हून अधिक लोकांनी चौकशी झाली आहे.







Powered By Sangraha 9.0