कोरोनानंतर चीनमध्ये फोफावतोय ब्युबॉनिक प्लेग!

06 Jul 2020 10:35:27

china_1  H x W:



चीनच्या आरोग्यसेवेकडून पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा जारी


चीन : उत्तर चीनमधील रूग्णालयात रविवारी ब्युबॉनिक प्लेगची संशयास्पद घटना समोर आल्यानंतर प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. गव्हर्नमेंट पीपल्स डेली ऑनलाईनच्या वृत्तानुसार अंतर्गत मंगोलियन स्वायत्त प्रदेश, बाय्नूर येथे प्लेगच्या प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी तिसर्‍या स्तराचा इशारा देण्यात आला आहे.


शनिवारी बाय्नूर येथील रूग्णालयात ब्युबॉनिक प्लेगचा हा संशयित प्रकार उघडकीस आला. स्थानिक आरोग्य विभागाने हा इशारा २०२० अखेरपर्यंत जारी केला आहे. यावेळी शहरात प्लेगच्या साथीचा धोका असल्याचे स्थानिक आरोग्य प्राधिकरणाने सांगितले. जनतेने यासंदर्भात जागरूकता वाढवायला पाहिजे आणि तब्येतीत काही असामान्य बदल दिसल्यास आरोग्यसेवेस त्वरित माहिती दिली पाहिजे, असे चीन सरकारने सांगितले आहे. 


बुबोनिक प्लेगला 'ब्लॅक डेथ' म्हणूनही ओळखले जाते. ज्यात शरीरात असह्य वेदना, तीव्र ताप आणि नाडीची गती वाढते. या वेदना नंतर भाजलेल्या वेदनेपेक्षा जास्त दुखतात.


प्लेग प्रथम उंदीरात होतो आणि नंतर जेव्हा उंदीर मरतात तेव्हा प्लेगच्या जीवाणूंनी भरलेला पिसू त्या माणसाच्या शरीरात प्रवेश करतो. आणि जेव्हा एखाद्या माणसाला हा पिसू चावतो तेव्हा त्या आतला संसर्गजन्य द्रव रक्तात शिरतो, जो मानवांना संक्रमित करतो. उंदीर मेल्यानंतर दोन ते तीन आठवड्यांनंतर मानवामध्ये प्लेग पसरतो.
Powered By Sangraha 9.0