भारतीय जवानांनी गलवान खोऱ्यात मारले १०० चीनी सैनिक !

    दिनांक  06-Jul-2020 14:41:33
|
Yang Jianli  _1 &nbs

बिजिंग : गलवान खोऱ्यात भारत-चीन सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीत एकूण शंभर चीनी सैनिक मारले गेले आहेत, असा दावा निवृत्त चीनी लष्करी अधिकारी आणि चीनी कम्युनिस्ट पक्षाचा नेता जियानली यांग यांनी केला आहे. १५ जून रोजी झालेल्या झटापटीत भारतीय जवानांनी शंभर चीन सैनिकांना ठार केल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर सैन्य मारले जात असतानाही चीनने जवानांच्या मृत्यूची आकडेवारी अधिकृतरित्या घोषित केलेली नाही, असा आरोपही त्यांच्यावर केला आहे. ही बाब जर खरी असेल तर राष्ट्राध्यक्ष शी जिंगपिंग यांच्यासाठी ही मोठी हार मानली जात आहे. त्यांच्यात पक्षातून त्यांच्याविरोधात पुकारण्यात आलेला हा बंड त्यांना महागात पडू शकतो.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.